Mohit Kamboj | सुनिल पाटीलला क्रुझ पार्टीची माहिती होती, मोहित कंबोज यांचे आरोप
मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषदेत सॅम डिसुझाचा व्हिडीओ देखील दाखवला. त्यामध्ये सॅम डिसुझाचा व्हिडीओ, सुनील पाटील आणि सॅम डिसुझा यांच्यातील व्हॉटसअप चॅट शेअर करत सुनील पाटीलच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.
मुंबई: भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेत मुंबईतील ड्रग्ज पार्टी आणि पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रश्नांची सरबत्ती केलीय. किरण गोसावी हा सुनील पाटीलचा माणूस असल्याचा दावा कंबोज यांनी केला. सुनील पाटील हा ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला. सुनील पाटील याला ड्रग्ज पार्टीची माहिती होती. ड्रग्ज पार्टीची माहिती सुनील पाटील यानं सॅम डिसुझाला दिली असल्याचा दावा मोहित कंबोज यांनी केला. मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषदेत सॅम डिसुझाचा व्हिडीओ देखील दाखवला. त्यामध्ये सॅम डिसुझाचा व्हिडीओ, सुनील पाटील आणि सॅम डिसुझा यांच्यातील व्हॉटसअप चॅट शेअर करत सुनील पाटीलच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.