सुनील पाटील यांच्याकडून जीवे मारण्याची धमकी, स्वत:सह कुटुंबाला पोलीस सुरक्षेची मागणी
बहुचर्चित आर्यन खानच्या ड्रग्ज कारवाई प्रकरणी माध्यमांसमोर आल्यानंतर प्रत्यक्षदर्शी विजय पगारे यांनी सरकारने सुरक्षा पुरवावी, अशी मागणी केलीय. त्यांना वारंवार जीवे मारण्याची धमकी येत असल्याने सरकारने सुरक्षा पुरवावी, अशी मागणी विजय पगारे यांनी केली.
मुंबई : बहुचर्चित आर्यन खानच्या ड्रग्ज कारवाई प्रकरणी माध्यमांसमोर आल्यानंतर प्रत्यक्षदर्शी विजय पगारे यांनी सरकारने सुरक्षा पुरवावी, अशी मागणी केलीय. त्यांना वारंवार जीवे मारण्याची धमकी येत असल्याने सरकारने सुरक्षा पुरवावी, अशी मागणी विजय पगारे यांनी केली. मुंबई ड्रग्स केस आणि आर्यन खान प्रकरणात रोज नवीन आणि खळबळजनक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील साक्षीदार असलेल्या विजय पगारे यांनी मोठे मोठे गौप्यस्फोट केले आहेत. यानंतर त्यांना आता धमक्या येऊ लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारकडे सुरक्षा पुरविण्याची मागणी केली आहे.