अनंत गीतेंचं वक्तव्य वैफल्यातून, खासदार सुनील तटकरेंचा पलटवार
सुनील तटकरे

अनंत गीतेंचं वक्तव्य वैफल्यातून, खासदार सुनील तटकरेंचा पलटवार

| Updated on: Sep 21, 2021 | 12:59 PM

अनंत गीते यांनी जे वक्तव्य केलं, त्याबाबत मी बोलणार आहे. अनंत गीते यांनी केलेली वक्तव्ये नैराश्यातून आहेत, ते अडगळीत पडले आहेत. त्यांच्या बोलण्याने पवार साहेबांचं कर्तृत्व कमी होणार नाही, असं सुनील तटकरे म्हणाले.

शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते (Anant Geete) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर केलेल्या टीकेला आता राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी जशास तसं उत्तर दिलं. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सुनील तटकरेंनी शेलक्या शब्दात अनंत गीते यांचा समाचार गेतला.

“अनंत गीते यांनी जे वक्तव्य केलं, त्याबाबत मी बोलणार आहे. अनंत गीते यांनी केलेली वक्तव्ये नैराश्यातून आहेत, ते अडगळीत पडले आहेत. त्यांच्या बोलण्याने पवार साहेबांचं कर्तृत्व कमी होणार नाही. अतिनैराश्यापोटी राजकीय भान हरपून केलेली टीका आहे. राज्याला, देशाला पवार साहेबांचं काम माहिती आहे. गीते यांची अवस्था आता सांगताही येत‌ नाही, सहनही होत नाही अशी झाली आहे. सूर्यावर थुंकण्याचा हा प्रयत्न आहे”, असं सुनील तटकरे म्हणाले.

श्रावण संपताच महागाईची फोडणी; चिकन 10 रुपयांनी तर अंडी एक रुपयांनी महागली
VIDEO : Sanjay Raut | किरीट सोमय्यांना आम्ही ओळखत नाही – संजय राऊत