Super Fast 100 News | सुपरफास्ट 100 न्यूज | 21 July 2021
मुंबईसोबतच राज्यातील जालना, बीड, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
अनेक दिवस दडी मारल्यानंतर पावसाने राज्यात जोरदार कमबॅक केले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. आज सकाळपासून मुंबई आणि उपनगराच्या परिसरात वेगवान वाऱ्यांसह पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. मुंबईसोबतच राज्यातील जालना, बीड, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.