Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज
फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याचं खापर मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीवर फोडलं आहे. फॉक्सकॉन कंपनीला गेल्या दोन वर्षात मविआ सरकारडून हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.
फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याचं खापर मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीवर फोडलं आहे. फॉक्सकॉन कंपनीला गेल्या दोन वर्षात मविआ सरकारडून हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. तर महाविकास आघाडीने दुसऱ्यावर खापर फोडू नये, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली. तसंच मुख्यमंत्र्यांनी मोदींशी चर्चा केली आहे. त्यानंतर मोठा प्रकल्प महाराष्ट्रात येणार असल्याचं आश्वासन मोदींनी दिल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं आहे. यासोबतच राज्यातील इतर महत्त्वपूर्ण अपडेट्स पाहुयात..