Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2.30 PM | 2 December 2021

| Updated on: Dec 02, 2021 | 3:22 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. एचएन रिलायन्स रुग्णालयात त्यांच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. रिलायन्स हॉस्पिटलचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. एचएन रिलायन्स रुग्णालयात त्यांच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. रिलायन्स हॉस्पिटलचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया केली. सकाळी केल्या जाणाऱ्या चाचणीच्या अहवालानंतर उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज देण्यात आला, त्यानंतर सुपुत्र आदित्या ठाकरे यांच्यासह ते वर्षा या शासकीय निवासस्थानी रवाना झाले.

मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांना मान आणि मणक्याचा त्रास होत होता. एका कार्यक्रमात ते मानेला पट्टा बांधून आल्याचे दिसले होते. हा त्रास वाढल्यामुळे त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहणे टाळले होते. तसेच दिवाळीनिमित्त भेटीसाठी आलेल्या मान्यवरांनादेखील ते भेटले नव्हते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर 12 नोव्हेंबर रोजी सर्व्हायकल स्पाईन संबंधित यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. गिरगावातील एच. एन. रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

Ashok Chavan | ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ वक्तव्यांवर अशोक चव्हाणांचं ट्वीट, राजकीय वर्तुळात चर्चा
इतर राज्यातील मुख्यमंत्री राज्यात आले म्हणजे उद्योग पळवायला आले असा अर्थ होत नाही – Ajit Pawar