Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 4.30 PM | 22 November 2021

| Updated on: Nov 22, 2021 | 5:29 PM

मुंबईमध्ये वरळी येथील सेंट्रल हॉटेलमध्ये शरद पवार, परिवहन मंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीत पवारांनी संपाची माहिती घेतली. संपाबाबत कोणते पर्याय असू शकतात, याची चर्चा केली, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.

अखेर अतिशय ताणलेल्या आणि चिघळलेल्या एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी सकाळी साडेचार तास ज्येष्ठ नेते आणि महाविकास आघाडीचे तारणहार शरद पवार यांनी बैठक घेतली. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती. मात्र, या बैठकीत काहीही ठोस निर्णय झाला नसल्याची माहिती समोर आलीय. स्वतः अनिल परब यांनी पत्रकार परिषदत घेऊन ही माहिती दिली. यामुळे मुंबईतल्या आझाद मैदानावर संपावर बसलेल्या कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी परब जर रोज तेच-तेच बोलत असतील, तर त्या बैठकीला अर्थ काय, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

मुंबईमध्ये वरळी येथील सेंट्रल हॉटेलमध्ये शरद पवार, परिवहन मंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीत पवारांनी संपाची माहिती घेतली. संपाबाबत कोणते पर्याय असू शकतात, याची चर्चा केली, अशी माहिती अनिल परब यांनी दिली. या बैठकीत संपाबाबत समितीसमोर कोणती बाजू मांडायची यावरही विचार झाला. एसटीचे उत्पन्न कसे वाढू शकते, यावरचही चर्चा झाली. मात्र, संपाबाबत लगेच ठाम निर्णय झाला नाही. यावर पुन्हा एकदा शरद पवार यांची भेट घेणार आहे, अशी माहितीही परब यांनी दिली. एकंदर आजची पवारांनी घेतलेली बैठक फक्त एक प्रकारची चाचपणी होती. त्यामुळे तूर्तास लगेच संप मिटेल, अशी शक्यता तरी दिसत नाही.

Gopichand Padalkar | आमचा नाद चांगला आहे की पवारांचा हे कर्मचाऱ्यांना विचारा- गोपीचंद पडळकर
Navneet Rana | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अनिल परब सरकारमध्ये फेल : नवनीत राणा