SuperFast 100 News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 22 July 2021
कसारा आणि आसपासच्या परिसरातील सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे उमरमाली आणि कसारा रेल्वे स्टेशनवर ट्रॅकवर पाणी साचलं आहे.
मुंबई : राज्यात गेल्याक काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कसारा आणि आसपासच्या परिसरातील सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे उमरमाली आणि कसारा रेल्वे स्टेशनवर ट्रॅकवर पाणी साचलं आहे. इगतपुरी आणि कसाराच्यामध्ये दरड कोसळली आहे. त्यामुळे खर्डी रेल्वे स्टेशनवर अमरावती एक्स्प्रेस ठप्प आहे. तसेच कसारा रेल्वे स्टेशनवर डाऊन पंजाब एक्स्प्रेस, अप कुशीनगर एक्स्प्रेस, अप अमृतसर एक्स्प्रेस आणि अप कामायनी एक्स्प्रेस दहा वाजल्यापासून थांबलेली आहे.