50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज |

| Updated on: Jul 10, 2021 | 6:11 PM

बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी राजीनामे दिले आहेत. एकूणच 14 पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे.

50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज |

1) बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी राजीनामे दिले आहेत. एकूणच 14 पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे.

2) जरंडेश्वर साखर कारखान्याप्रकरणी सातारा जिल्हा बँकेला ईडीची नोटीस पाठवण्यात आली आहे. बँकेने जरंडेश्वर साखर कारखान्याला 96 कोटी रुपये दिले होते. त्याप्रकरणी बँकेची चौकशी करण्यात येणार आहे.

3) जरंडेश्वर साखर कारखान्याप्रकरणी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेलासुद्धा ईडीने नोटीस दिली आहे. पुणे जिल्हा बँकेला जरंडेश्वर साखर कारखान्याला शंभर कोटींचं कर्ज दिलं होतं.

4) विधानसभा अध्यक्षपदासाठी आपल्या कोट्यातील मंत्रिपदाचा बळी देऊ नये, असे वक्तव्य शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केलं आहे.

 

Video | राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्वप्निल गेला, सरकार मदत कधी करणार ? : गोपीचंद पडळकर
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines