SuperFast 50 News | 2.30 PM | 20 August 2021
खासदार संभाजी छत्रपती यांनी आज मराठा मूक आंदोलनाला संबोधित करताना मोठा गौप्यस्फोट केला. संसदेत घटना दुरुस्तीवर बोलण्यासाठी मी परवानगी मागितली होती. पण मला परवानगी नाकारण्यात आली. महाराष्ट्रातील आपल्या खासदारांमुळे मला बोलायला संधी देण्यात आली.
खासदार संभाजी छत्रपती यांनी आज मराठा मूक आंदोलनाला संबोधित करताना मोठा गौप्यस्फोट केला. संसदेत घटना दुरुस्तीवर बोलण्यासाठी मी परवानगी मागितली होती. पण मला परवानगी नाकारण्यात आली. महाराष्ट्रातील आपल्या खासदारांमुळे मला बोलायला संधी देण्यात आली. मात्र, ही संधी देण्यात आली नसती तर त्याच दिवशी खासदारकी सोडणार होतो, असा गौप्यस्फोट संभाजी छत्रपती यांनी केला. मला समाजाची भावना मांडायची आहे. त्यामुळे मला संसदेत बोलण्याची परवानगी द्या, अशी मागणी मी केली होती. पण मला बोलायला परवानगी दिली नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट भांडल्याशिवाय मिळत नाही हे माझ्या लक्षात आलं. आपल्याकडे समाजाची ताकद आहे. शिव-शाहूंचा वारसा आहे. हा वारसा गप्प बसणार का? शिवाजी महाराजांनीही औरंगजेबला धुडाकवून लावलं होतं. त्यामुळे त्याच दिवशी मी ठरवलं होतं. त्या दिवशी बोलायला दिलं नसतं तर अरे कुठली खासदारकी सोडून टाकली, असं म्हणून मी बाहेर पडणार होतो. पण नंतर मला बोलायला संधी दिली. तेव्हा माझ्या भाषणाच्या सुरुवातीलाच मी सरकारला सवाल केला. ज्या शाहू महाराजांनी देशात पहिल्यांदा आरक्षण दिलं. त्यांच्या पणतूला तुम्ही दोन मिनिटं बोलायला देत नसेल तर उपयोग काय माझा अशी सुरुवात मी केली, असं सांगतानाच महाराष्ट्रातील खासदारांनी मला बोलता यावं म्हणून मदत केली. त्यांचे आभार मानतो, असं संभाजी छत्रपती म्हणाले.