100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 1 September 2021
शेखर सावरबांधे यांच्या राजीनाम्यानंतर शिवसैनिकांना तातडीने मुंबईला पाचारण करण्यात आलं आहे. विदर्भ एक्स्प्रेसने नाराज शिवसैनिकांची फौज मुंबईला रवाना होत आहे. नागपुरातील सेनेच्या नव्या कार्यकारिणीनंतर मोठा असंतोष उफाळला आहे.
शिवसेनेचे माजी नागपूर जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे (Shekhar Sawarbandhe) राष्ट्रवादीत गेल्याने पक्षात एकच खळबळ उडाली आहे. नागपुरातील शिवसेनेत असलेल्या असंतोषाची कारणं मुंबईहून मागवल्याची माहिती मिळत आहे. नागपुरातील नाराज शिवसैनिक आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. शेखर सावरबांधे यांच्या राजीनाम्यानंतर शिवसैनिकांना तातडीने मुंबईला पाचारण करण्यात आलं आहे. विदर्भ एक्स्प्रेसने नाराज शिवसैनिकांची फौज मुंबईला रवाना होत आहे. नागपुरातील सेनेच्या नव्या कार्यकारिणीनंतर मोठा असंतोष उफाळला आहे. नागपूरमध्ये सेनेवर हिंदी भाषिकांनी कब्जा केल्याचा आरोप होत आहे. निष्ठावंतांना डावलत असल्याने शिवसैनिकांमध्ये मोठी नाराजी असून नजीकच्या काळात नागपुरातील शिवसेनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे