SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 15 September 2021
दरेकर माफी मागा. नाही तर महिलांचा अपमान करणाऱ्यांचं आम्ही थोबाड आणि गाल रंगवू, असा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे. दरेकर यांचं हे विधान महिलांचा अवमान करणारं असल्याचंही त्या म्हणाल्या
राष्ट्रवादी काँग्रेसला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे, अशी खोचक टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली होती. त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी संताप व्यक्त केला आहे. दरेकर माफी मागा. नाही तर महिलांचा अपमान करणाऱ्यांचं आम्ही थोबाड आणि गाल रंगवू, असा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे. दरेकर यांचं हे विधान महिलांचा अवमान करणारं आहे. प्रविण दरेकर, महिलांची माफी मागा. नाही तर आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो याची जाणीव ठेवा, असा इशारा चाकणकर यांनी दिला आहे.