SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 12 August 2021

| Updated on: Aug 12, 2021 | 8:37 AM

राज्यातील सर्व व्यापारी दुकाने सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. दुकानात काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर 14 दिवसाचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक राहिल.

कोरोनासह विविध मुद्द्यांवर बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. राज्यात 15 ऑगस्टपासून मोठी शिथिलता देण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्याबाबत घोषणा केली आहे. यामुळे सामान्य नागरिक, व्यापारी वर्ग, कर्मचारी यांना दिलासा मिळणार आहे.

राज्यात कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे साथरोग कायदा, 1897 ची, आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी सुरु आहे. राज्यात कोविड-19 ची दुसरी लाट आटोक्यात येत आहे. परंतु अद्यापही कोविड रुग्ण आढळून येत असल्याने राज्यात कोविड प्रतिबंधक उपाययोजना करण्याची आवश्यकता भासत आहे. त्याअर्थी, आता साथरोग अधिनियम, 1897 च्या खंड 2 नुसार प्राप्त अधिकार व आपत्ती निवारण कायदा, 2005 नुसार सक्षम प्राधिकारी म्हणून अध्यक्ष, राज्य व्यवस्थापन समिती या आदेशाद्वारे उपरोक्त संदर्भ क्रमांक 4 व 5 मध्ये नमूद आदेश अधिक्रमित करून संपूर्ण राज्यासाठी खालील निर्देश पारित करीत आहे :

Published on: Aug 12, 2021 08:37 AM
Dadar | मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही दादरच्या मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी
Scholarship Exam | राज्यात आज शिष्यवृत्तीची परीक्षा, मुंबईत मात्र अचानक परीक्षा रद्दचा निर्णय