SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 14 July 2021
पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारामध्ये आज आणि उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात पुढील पाच दिवस सर्वत्र पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारामध्ये आज आणि उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के.एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबच्या पट्टा तयार झाल्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर त्याचा परिणाम पाहायला मिळेल. त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसांत किनारपट्टीलगत असणाऱ्या भागांमध्ये जोरदार पाऊस पडेल. त्यादृष्टीने मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.