SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 14 November 2021

| Updated on: Nov 14, 2021 | 9:06 AM

माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडेची देशभरातील नक्षलवादी कारवायांमध्ये महत्वाची भूमिका राहिली आहे. मिलिंद तेलतुंबडे उर्फ सह्याद्री उर्फ ज्योतिराव उर्फ श्रीनिवास या नावाने ओळख असलेला हा माओवादी नेता गडचिरोली पोलिसांच्या कारवाईत ठार झाला आहे. समाजाच्या काही घटकांमध्ये हिंसक विचारसरणी पेरुन नक्षल भरती करण्यात त्याचा मोठा हात होता.

गडचिरोली नक्षलविरोधी पोलीस पथकाने चकमकीत माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडेला ठार केल्याची अधिकृत माहिती गडचिरोली पोलिसांनी दिलीये. चकमकीत नगरचा मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याची अधिकृत माहिती पोलिसांनी दिली.

मिलिंद तेलतुंबडे माओवादी संघटनेच्या केंद्रीय सेंट्रल झोन कमिटीचा सदस्य होता. महाराष्ट्र, छत्तीसगढ, तेलंगाना, आंध्र प्रदेश, ओदिशा इत्यादी 6 राज्यात तो सक्रिय नक्षलवादी होता. त्याच्यावर तब्बल 1 कोटी 20 लाख रुपयांचे बक्षीस होते.

माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडेची देशभरातील नक्षलवादी कारवायांमध्ये महत्वाची भूमिका राहिली आहे. मिलिंद तेलतुंबडे उर्फ सह्याद्री उर्फ ज्योतिराव उर्फ श्रीनिवास या नावाने ओळख असलेला हा माओवादी नेता गडचिरोली पोलिसांच्या कारवाईत ठार झाला आहे. समाजाच्या काही घटकांमध्ये हिंसक विचारसरणी पेरुन नक्षल भरती करण्यात त्याचा मोठा हात होता. पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मिलिंद तेलतुंबडेचा मृत्यू झाल्याने नक्षलवाद्यांसाठी हा मोठा झटका असणार आहे.

Published on: Nov 14, 2021 09:06 AM
Saamana | जय भीम चित्रपटातून जळजळीत वास्तव दिसलं – सामना
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 14 November 2021