SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 14 October 2021

| Updated on: Oct 14, 2021 | 8:42 AM

महाराजांचा पुतळा उंच आहे. यावर मी चढू शकत नाही. कार्यकर्ते आणि इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला वर चढवलं. अनेक जणांनी वर चढून महाराजांना पुष्पहार चढवला. फक्त माझाच व्हिडीओ व्हायरल केला जातोय. यावेळी शिवसेनेचे माजी आमदार डॉ जयप्रकाश मुंदडा आणि इतर नेतेही वर चढले होते. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा कार्यकर्ता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्यावर पुष्पहार अर्पण करताना दिसत आहेत. पण यावेळी ते शिवाजी महाराज ज्या घोड्यावर बसले आहेत त्याच घोड्यावर चढून पुष्पहार अर्पण करतानाचे दृश्य आहेत. त्यांच्या या कृतीवरुन सोशल मीडियावर प्रचंड टीका झाली. नवघरे यांच्या या कृतीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणावरुन टीकेची झोड उठल्यानंतर आमदार राजू नवघरे यांना आपली चूक लक्षात आली. त्यानंतर त्यांनी जाहीर माफी मागत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.

“महाराजांचा पुतळा उंच आहे. यावर मी चढू शकत नाही. कार्यकर्ते आणि इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला वर चढवलं. अनेक जणांनी वर चढून महाराजांना पुष्पहार चढवला. फक्त माझाच व्हिडीओ व्हायरल केला जातोय. यावेळी शिवसेनेचे माजी आमदार डॉ जयप्रकाश मुंदडा आणि इतर नेतेही वर चढले होते. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा कार्यकर्ता आहे. पुतळा शहरात उभारावा यासाठी मी भरपूर प्रयत्न केले. महाराजांचे जंगी स्वागत व्हावे म्हणून पोलिसांची परवानगी नसतांना आम्ही नोटीसा स्वीकारून महाराजांच्या स्वागतासाठी बँड लावला. पण माझ्यासारख्या सामान्य माणसाला राजकीय षडयंत्रातून बदनाम केलं जातंय”, असं आमदार नवघरे म्हणाले.

Published on: Oct 14, 2021 08:42 AM
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 14 October 2021
Baramati | सोमेश्वर साखर कारखान्याचा आज निकाल, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला