SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 16 September 2021
राज्य सरकारच्या या निर्णयावर भाजप नेत्या पंकजा मुंडे (BJP leader Pankaja Munde) यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी सर्व निवडणुकीसाठी नवा अध्यादेश लागू होईल याची सरकार खात्री देईल का? असा प्रश्न विचारला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांच्या निवडणुकांची (local body election) घोषणा केल्यानंतर आता ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ओबीसींच्या आरक्षणासाठी (OBC reservation ) राज्य सरकार अध्यादेश जारी करणार आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयावर भाजप नेत्या पंकजा मुंडे (BJP leader Pankaja Munde) यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी सर्व निवडणुकीसाठी नवा अध्यादेश लागू होईल याची सरकार खात्री देईल का? असा प्रश्न विचारला आहे.
ओबीसींना राजकीय आरक्षणाचा लाभ देण्यासाठी अध्यादेश काढणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. मात्र, पंकजा मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. सर्व निवडणुकीसाठी अध्यादेश लागू होईल याची खात्री सरकार देईल का ? आता लागलेल्या निवडणुकीत काढलेला अध्यादेश लागू होईल का, असं मुंडे यांनी विचारलंय. तसेच पुढे ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत व्हावे ही काळाची गरज आहे, असे मत मुंडे यांनी ट्विटद्वारे मांडले आहे.