SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 18 October 2021

| Updated on: Oct 18, 2021 | 8:54 AM

काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे भाऊजी असलेले भास्करराव पाटील खतगावकर यांनी 7 वर्षापूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णाही भाजपवासी झाले होते. पण या दोन्ही नेत्यांना भाजपमध्ये योग्य स्थान आणि सन्मान मिळत नसल्यानं ते नाराज होते.

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अशावेळी नांदेडमध्ये भाजपला मोठा झटका बसलाय. नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर आणि माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी आज काँग्रेसमध्ये घरवापसी केलीय. देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वीच खतगावकर काँग्रेसमध्ये गेल्यानं भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे भाऊजी असलेले भास्करराव पाटील खतगावकर यांनी 7 वर्षापूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णाही भाजपवासी झाले होते. पण या दोन्ही नेत्यांना भाजपमध्ये योग्य स्थान आणि सन्मान मिळत नसल्यानं ते नाराज होते. अशोक चव्हाण यांना आपल्या भाऊजींचे मन वळवण्यात अखेर यश आलं आहे. त्यानंतर भास्करराव पाटील खतगावकर आणि ओमप्रकाश पोकर्णा यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपला रामराम ठोकत असल्याचं जाहीर केलंय.

Published on: Oct 18, 2021 08:54 AM
Sinhagad Express | 19 महिने बंद असलेली सिंहगड एक्सप्रेस आजपासून पुणे-मुंबईकरांच्या सेवेत सुरू
Kerala Flood | केरळमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरुच, पुरात कोट्टायममध्ये घर गेलं वाहून