SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 24 October 2021
कोरोना काळात लोकांच्या मदतीला धावून जाणे अपेक्षित होते. मात्र, भाजपच्या नागपुरातील 52 नगरसेविकांपैकी काही नगरसेविका जनतेपर्यंत पोहोचल्या नाहीत. त्यामुळे अशा महिला नगरसेविकांवर मतदार नाराज असल्याची माहिती आहे. ही बाब लक्षात घेऊन भाजप खबरदारी म्हणून अनेक नगरसेविकांचं तिकीट कापण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागल्याचं पाहायला मिळतंय. नागपुरात जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत झटका बसल्यानंतर आता भाजपनं महापालिका निवडणुकीसाठी मोठी खबरदारी घेतल्याचं दिसून येत आहे. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपमधील अनेक महिला नगरसेविकांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे. सध्या नागपुरात भाजपच्या 52 पेक्षा जास्त महिला नगरसेविका आहेत.
कोरोना काळात लोकांच्या मदतीला धावून जाणे अपेक्षित होते. मात्र, भाजपच्या नागपुरातील 52 नगरसेविकांपैकी काही नगरसेविका जनतेपर्यंत पोहोचल्या नाहीत. त्यामुळे अशा महिला नगरसेविकांवर मतदार नाराज असल्याची माहिती आहे. ही बाब लक्षात घेऊन भाजप खबरदारी म्हणून अनेक नगरसेविकांचं तिकीट कापण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. प्रत्येक निवडणुकीत 30 टक्क्यांच्या आसपास तिकीट बदलली जातात. पक्ष नव्या चेहऱ्यांना संधी देतं. या निवडणुकीतही भाजपमधील 30 टक्के विद्यमान नगरसेवकांची तिकीटं कापली जातील. त्यात महिला नगरसेविकांचाही समावेश असेल, अशी मागणी महापालिकेतील भाजपचे नेते अविनाश ठाकरे यांनी दिलीय.