SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 27 September 2021

| Updated on: Sep 27, 2021 | 8:12 AM

ध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टी भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अत्यंत खराब हवामानाचा इशारा ऑरेंज अलर्टच्या स्वरूपात दिला जातो आणि या दरम्यान रस्ते आणि रेल्वे वाहतूक बंद होण्याची आणि वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता असते.

भारतीय हवामान विभागाने (IMD) आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीच्या काही भागात ‘गुलाब’ (Cyclone Gulab)चक्रीवादळाचा इशारा जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या क्षेत्राचं शनिवारी ‘गुलाब’ चक्रीवादळामध्ये रुपांतरीत झालं आहे.

आयएमडीने म्हटले आहे की, वायव्य आणि लगतच्या पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र गेल्या सहा तासांमध्ये 7 किमी प्रतितास वेगाने पश्चिमेकडे सरकले आहे. ‘गुलाब’ चक्रीवादळात तीव्र झाले असून उत्तर आंध्र प्रदेश आणि लगतच्या दक्षिण ओडिशासाठी वादळाचा इशारा जारी करण्यात आला आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टी भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अत्यंत खराब हवामानाचा इशारा ऑरेंज अलर्टच्या स्वरूपात दिला जातो आणि या दरम्यान रस्ते आणि रेल्वे वाहतूक बंद होण्याची आणि वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता असते.

Published on: Sep 27, 2021 08:12 AM
Narayan Rane | मुख्यमंत्र्यांवर केलेल्या वक्तव्याप्रकरणी नारायण राणेंनी नोंदवला जबाब
Farmers | केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱी संघटनांनी पुकारला भारत बंद