SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 3 November 2021
देगलूर पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांनी दणदणीत विजय मिळविला. अंतापूरकरांनी भाजपच्या सुभाष साबणे यांना आस्मान दाखवलं. पण हा विजय शक्य झाला काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांच्या नियोजनाने आणि त्यांच्या परिश्रमाने…! कालच्या विजयानंतर अशोक चव्हाण यांना महाविकास आघाडीच्या शीर्षस्थ नेत्यांनी फोन केला.
देगलूर पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांनी दणदणीत विजय मिळविला. अंतापूरकरांनी भाजपच्या सुभाष साबणे यांना आस्मान दाखवलं. पण हा विजय शक्य झाला काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांच्या नियोजनाने आणि त्यांच्या परिश्रमाने…! कालच्या विजयानंतर अशोक चव्हाण यांना महाविकास आघाडीच्या शीर्षस्थ नेत्यांनी फोन केला. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनी पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण यांना फोन करुन देगलूरच्या विजयाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं.
काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या देगलूर बिलोली पोटनिडणुकीमध्ये अशोक चव्हाण आणि भाजपच्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अशोक चव्हाण यांनी प्रचारासाठी तब्बल महिनाभर नांदेडमध्ये तळ ठोकला होता. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यातील भाजप नेत्यांची फौज देगलूरमध्ये उतरवली होती. मात्र, काँग्रेस उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी भाजपच्या सुभाष साबणेंना पराभूत करत विधानसभेत धमाकेदार एन्ट्री केली.