SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 6 September 2021
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने कुस्त्यांच्या दंगलीवर किंवा कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यावर निर्बंध घातले आहेत, परंतु शासनाच्या या निर्णयाला केराची टोपली दाखवत भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे हनुमान व्यायाम शाळा शाळेत कुस्ती दंगलीचे आयोजन करण्यात आले होते.
भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे हनुमान व्यायाम शाळेत शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत कुस्त्यांची दंगल भरण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे चक्क वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दोन पहिलवानांची कुस्ती लावली आहे. नाशिकचे पोलीस महानिरीक्षक शेखऱ पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने कुस्त्यांच्या दंगलीवर किंवा कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यावर निर्बंध घातले आहेत, परंतु शासनाच्या या निर्णयाला केराची टोपली दाखवत भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे हनुमान व्यायाम शाळा शाळेत कुस्ती दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. यात अनेक पहिलवानांनी भाग घेतला असून या दंगलीत 25 कुस्त्या लावण्यात होत्या. तसेच ही कुस्ती दंगल पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली असून कुणीही मास्क लावला नव्हता.