SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 8 August 2021
आरोपी हा बेलोरा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहे. त्याने अल्पवयीन विद्यार्थ्यीनीला तुला चांगलं शिकवतो, तुला अव्वल गुण मिळतील, असं आमिष दाखवत अत्याचार केला. तो गेल्या दोन महिन्यांपासून मुलीवर अशाप्रकारे अत्याचार करत होता.
अल्पवयीन विद्यार्थीनीला परीक्षेत चांगल्या गुणांनी पास करण्याचे आमिष देऊन गेल्या दोन महिन्यांपासून शारीरीक अत्याचार करणाऱ्या नराधमाला गावकऱ्यांनी प्रचंड चोपलं. संबंधित प्रकार हा यवतमाळ तालुक्यातील बेलोरा जिल्हा परिषद शाळेत घडला. नराधम शिक्षकाला गावकऱ्यांनी आज (7 ऑगस्ट) मुलीवर अत्याचार करताना रंगेहात पकडलं. त्यानंतर त्याला प्रचंड चोप दिला. या शिक्षकाचं नाव अरुण राठोड असं आहे. तो सध्या पोलिसांच्या ताब्यात असून जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
आरोपी हा बेलोरा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहे. त्याने अल्पवयीन विद्यार्थ्यीनीला तुला चांगलं शिकवतो, तुला अव्वल गुण मिळतील, असं आमिष दाखवत अत्याचार केला. तो गेल्या दोन महिन्यांपासून मुलीवर अशाप्रकारे अत्याचार करत होता. अखेर गावातील तरुणांना याबाबतची कुणकुण लागली होती. त्यांनी शिक्षकाला रंगेहाथ पकडून चोप दिला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गावकऱ्यांच्या तावडीतून शिक्षकाची सूटका करुन त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं.