SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 8 October 2021

| Updated on: Oct 08, 2021 | 8:26 AM

महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सकाळी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारने महाराष्ट्रासह पाच राज्यांना अलर्ट दिला आहे. केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, मिझोराम आणि कर्नाटक आदी पाच राज्यात 10 हजाराहून कोरोनाचे सक्रिय रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे या पाच राज्यांनी डोकेदुखी वाढवल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

कोरोनाचं आव्हान अजूनही संपुष्टात आलेलं नाही. कोरोनाची दुसरी लाट नियंत्रित करण्यात आपण काही प्रमाणात अपयशी ठरल्याचं म्हणू शकतो. आपल्याला निरंतर प्रयत्न करण्याची गरज आहे. केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, मिझोराम आणि कर्नाटकात दहा हजारांपेक्षा अधिक सक्रिय रुग्ण आढळले आहेत, असं आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं.

Published on: Oct 08, 2021 08:19 AM
Sameer Wankhede | मुंबई-गोव्यात आतापर्यंत 94 प्रकरणं, एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंची माहिती
Saamna Editorial | जनतेने भाजपला जमिनीवरच ठेवलं, सामनातून विरोधकांना चिमटे