SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 9 October 2021

| Updated on: Oct 09, 2021 | 8:53 AM

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत सातत्याने ऊसाला एकरकमी भाव देण्याची मागणी करत आहेत. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शेट्टी आणि खोत यांना टोला लगावला आहे. हा टोला लगावता पवारांनी या दोन्ही नेत्यांना गुजरातचं उदाहरण दिलं आहे.

शरद पवार आज सोलापुरात होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मी साखर कारखानदार नाही. तुमचे मत असेल तर मी त्यासाठी आग्रह धरेन. उसाला एक रकमी रक्कम द्या असा एक शब्द निघालाय. ऊस गेला की रक्कम द्या अस म्हणतात. ऊस घातला की साखर तयार झाली आणि ती विकली जाते असे होत नाही. कारखान्यात वर्षानुवर्षे साखर पडून राहते. गुजरातमध्ये पहिला, दुसरा, तिसरा हप्ता केल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला. एक रकमीमध्ये शेतकऱ्यांचे हित किती हे पाहिले पाहिजे, असं पवार म्हणाले.

12 हजार कोटींचा दंड साखर कारखान्यांनी भरायला पाहिजे. या नोटिसा कशासाठी आहेत? या साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्त पैसे दिले आहेत. यामुळे सहकारी साखर कारखानदारी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. उत्तर प्रदेश मध्ये जास्त पैसे दिल्यावर कर लागत नाही. इकडे मात्र टॅक्स आणि दंड लावला जातो. हा काही न्याय नाही, असंही ते म्हणाले.

Published on: Oct 09, 2021 08:53 AM
Avinash Bhosale | पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यावर गुन्हा दाखल
Parbhani Corona | परभणीत एका विद्यार्थाला कोरोना, शाळा आठवडाभर बंद