VIDEO : 50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2.30 PM | 3 August 2021
कोविड मुळे बारावीची परीक्षा यंदा घेता आली नाही. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार करण्यात आलाय. दुपारी चार वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.
महाराष्ट्र बोर्ड बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाचीही उत्सुकता (Maharashtra HSC Result 2021) होती. बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला. यानुसार राज्याचा 12 वी निकाल 99.63 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 4 वाजता जाहीर होणार आहे. कोविड मुळे बारावीची परीक्षा यंदा घेता आली नाही. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार करण्यात आलाय. दुपारी चार वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. बारावीचा एकूण निकाल 99.63 टक्के लागला आहे. विज्ञान 99.45 टक्के, वाणिज्य 99.91 टक्के, कला 99.83 टक्के लागला असून यावर्षी 2.92 टक्क्यांनी निकाल वाढलाय.