VIDEO : 50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2.30 PM | 4 September 2021
राज्य सरकारनं दहीहंडी साजरी करु नका, असं आवाहन केल्यानंतरही मनसेनं आक्रमक भूमिका घेत मुंबईत दहीहंडी साजरी केली होती. विदर्भात बैलपोळा सणावर निर्बंध आणल्याने मनसे नेते संतप्त झाले आहेत. निर्बंधानंतरंही सोमवारी बैलपोळा सण साजरा करण्याचा इशारा मनसेनं दिला आहे.
राज्य सरकारनं दहीहंडी साजरी करु नका, असं आवाहन केल्यानंतरही मनसेनं आक्रमक भूमिका घेत मुंबईत दहीहंडी साजरी केली होती. विदर्भात बैलपोळा सणावर निर्बंध आणल्याने मनसे नेते संतप्त झाले आहेत. निर्बंधानंतरंही सोमवारी बैलपोळा सण साजरा करण्याचा इशारा मनसेनं दिला आहे. ‘शेतकऱ्यांनी बैलपोळा साजरा करावा, मनसे शेतकऱ्यांसोबत’, मनसैनिक स्वत: गावात जावून बैलपोळा साजरा करणार असल्याची माहिती मनसे नेते राजू उंबरकर यांनी दिला आहे. मनसेनं मेळावे, उद्घाटन कार्यकर्ता संमेलन चालतात, मग हिंदूंच्या सणावर बंदी का? असा सवाल उपस्थित केला आहे. मुंबईतील दहीहंडीप्रमाणे विदर्भात पोळा साजरा करण्यासाठी मनसे आक्रमक झाली आहे.