VIDEO : 50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 12 July 2021

| Updated on: Jul 12, 2021 | 2:43 PM

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष  नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे हे त्यांना माहीत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष  नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे हे त्यांना माहीत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. मी कुठे काय करतो ते सगळं त्यांना माहीत आहे”, असं म्हणत नाना पटोले यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केला आहे. ते काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित होते.

नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून, त्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. आगामी निवडणुका महाविकास आघाडीत न लढता काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढेल असा निर्धार नाना पटोले यांनी अनेकवेळा बोलून दाखवला आहे. त्यानंतर आता नाना पटोले यांनी पाळत ठेवत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांवर केल्याने, महाविकास आघाडीतील वाद हळूहळू समोर येत आहेत.

VIDEO : Pravin Darekar | सरकारमध्ये अविश्वासाचं वातावरण, मविआमध्ये अंतर्गत मतभेद – प्रवीण दरेकर
VIDEO : Urmila Matondkar Exclusive | स्वबळाचा निर्णय पक्षनेतृत्व घेणार : उर्मिला मातोंडकर