VIDEO : superfast 5050 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 12 September 2021
साकीनाकामधील बलात्कार पीडीत महिलेचा मृत्यू झाल्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाची एक टीम मुंबईत दाखल झाली आहे. महिला आयोगाच्या टीमने मुंबईत येऊन राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. राज्य सरकार आघाडीच्या राजकारणाची शिकार झाली आहे.
साकीनाकामधील बलात्कार पीडीत महिलेचा मृत्यू झाल्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाची एक टीम मुंबईत दाखल झाली आहे. महिला आयोगाच्या टीमने मुंबईत येऊन राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. राज्य सरकार आघाडीच्या राजकारणाची शिकार झाली आहे. त्यामुळेच राज्यात महिला आयोगाची स्थापना करण्यात आलेली नाही, अशी टीका राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या चंद्रमुखी देवी यांनी केली आहे. चंद्रमुखी देवी आणि त्यांची टीम मुंबईत आली आहे. या टीमने साकीनाका पोलीस ठाणे आणि राजावाडी रुग्णालयात जाऊन या प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधताना थेट राज्य सरकारवर हल्लाबोल केला.