VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 14 February 2022
कुडाळमध्ये आज भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले आहेत. यावेळी पोलिसांसमोर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. पोलिसांनीही दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना शांत होण्याचं आवाहन केलं. मात्र नगराध्यक्ष निवडणुकीवरुन तुफान राडा झाला. शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये यावेळी धक्काबुक्कीदेखील झाली.
कुडाळमध्ये आज भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले आहेत. यावेळी पोलिसांसमोर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. पोलिसांनीही दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना शांत होण्याचं आवाहन केलं. मात्र नगराध्यक्ष निवडणुकीवरुन तुफान राडा झाला. शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये यावेळी धक्काबुक्कीदेखील झाली. याबाबतचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका फॉरच्युनर कारला आधी अडवण्यात आलं. त्यानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धाऊन जाताना दिसलेत. यावेळी पोलिसांनीही वेळीच हस्तक्षेप करत वाद रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र आक्रमक झालेल्या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमुळे तुफान बाचाबाची झाल्याचं यावेळी पाहायला मिळालंय.