VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 23 March 2022

| Updated on: Mar 23, 2022 | 2:57 PM

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देश सुधारायचा असेल, भ्रष्टाचार नष्ट करायचा असेल तर त्यांचं मी स्वागत करते, पण असं सिलेक्टिव्ह लोकांविरोधात कारवाई करायची असेल तर याला आम्ही साथ देणार नाही, ED ची रेड करायची असेल तर सगळ्याच पक्षांवर करा, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देश सुधारायचा असेल, भ्रष्टाचार नष्ट करायचा असेल तर त्यांचं मी स्वागत करते, पण असं सिलेक्टिव्ह लोकांविरोधात कारवाई करायची असेल तर याला आम्ही साथ देणार नाही, ED ची रेड करायची असेल तर सगळ्याच पक्षांवर करा, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. दिल्लीत त्या पत्रकारांशी बोलत होत्या. पंतप्रधानांना या सर्व प्रकाराबद्दल मी अत्यंत विनम्रपणे याविषयीचा प्रश्न विचारणार आहे, असं सुळे यांनी सांगितलं. भाजपाच्या विरोधातील लोकांवर आरोप केले जातात. हेच लोक भाजपात आले की त्यांच्यावरील आरोप विरघळतात, हे असं का होतं? त्यांच्यावरील कारवाया कशा थांबतात, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.

VIDEO : काश्मीर फाईल इंटरवलनंतर फार बोअरींग सिनेमा, Jayant Patil यांची विधानसभेत फटकेबाजी
गुजरातमधील पेट्रोल पंपांवर महाराष्ट्रातील लोकांचीच गर्दी जास्त