VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 24 March 2022
आज विधान परिषदेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांच्यात चांगलीच खडाजंगी पहायला मिळाली. मुंबै बँक प्रकरणी मनिषा कायंदे यांनी संचालक मंडळ बरखास्त करून भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची मागणी केली. मनिषा कायंदे यांच्या या मागणीवर भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर चांगलेच भडकले.
आज विधान परिषदेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांच्यात चांगलीच खडाजंगी पहायला मिळाली. मुंबै बँक प्रकरणी मनिषा कायंदे यांनी संचालक मंडळ बरखास्त करून भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची मागणी केली. मनिषा कायंदे यांच्या या मागणीवर भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर चांगलेच भडकले. यावेळी त्यांनी विधान परिषदेत प्रत्युत्तर देताना, ‘कुणीही धुतल्या तांदळासारखे नाही, चूक असेल तर आम्ही तुरुंगात जाऊ, असं म्हणत मनिषा कायंदे आणि पर्यायाने महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला. पुढे बोलताना दरेकर म्हणाले, ‘विरोधी पक्ष नेत्याचे नाव घेताना नोटीस देणं आवश्यक आहे.’ दरम्यान, यावेळी सभागृहात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर चांगलेच भडकल्याचे दिसून आले.