VIDEO : 50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 28 July 2021

| Updated on: Jul 28, 2021 | 2:55 PM

शरद पवार निष्क्रीय मुख्यमंत्र्यांची मर्जी सांभाळत आहेत. त्यासाठी दौरे केले म्हणून पुतण्याची कान उघडणी करत आहेत. पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून हे सरकार ‘खुर्ची बचाव’ कार्यात व्यस्त आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.

महाराष्ट्रातील जनता आस्मानी संकटामुळे उद्धवस्त झाली आहे. शरद पवार निष्क्रीय मुख्यमंत्र्यांची मर्जी सांभाळत आहेत. त्यासाठी दौरे केले म्हणून पुतण्याची कान उघडणी करत आहेत. पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून हे सरकार ‘खुर्ची बचाव’ कार्यात व्यस्त आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली, सातारा आणि कोल्हापूरचा दौरा केला. अजित पवार यांनी या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील पूरस्थिती आणि नुकसानीची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. तसेच राज्याचं पुरामुळे झालेलं नुकसान आणि पूरग्रस्तांना द्यावयाची मदत यावरही चर्चा झाल्याची माहिती आहे.

VIDEO : Rahul Gandhi Live | विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न : राहुल गांधी
Kolhapur | पुराच्या पाण्यात खराब झालेल्या धान्याची विल्हेवाट