VIDEO : 50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 28 June 2021

| Updated on: Jun 28, 2021 | 3:49 PM

कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा 16 टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात चौथ्या स्तरावरील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तूची दुकान उघडायला परवानगी देण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा 16 टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात चौथ्या स्तरावरील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तूची दुकान उघडायला परवानगी देण्यात आली आहे. मात्र असं असलं तरीही जिल्ह्यातील व्यापारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आज कोणत्याही परिस्थितीत इतर सर्व दुकान उघडणार असा पवित्रा या व्यापाऱ्यांनी घेतला आहे.

तर दुसरीकडे प्रशासनानेही दुकान उघडल्यास कडक कारवाई करु असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापुरात व्यापारी आणि प्रशासनामध्ये संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे. काल झालेल्या बैठकीत आजपासून दुकान उघडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर अनेक व्यापाऱ्यांनी कोल्हापुरातील महाद्वार रोड या ठिकाणी गर्दी केली.

Published on: Jun 28, 2021 03:00 PM
VIDEO : Fast News | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी | 1:30 PM | 28 June 2021
VIDEO : Headline | 2 PM | फडणवीसांना संन्यास घेऊ देणार नाही : संजय राऊत