VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 31 March 2022
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांच्या घरावर गुरुवारी सकाळी अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने धाड टाकली. पाच तास चाललेल्या धाडीनंतर सतीश उके आणि त्यांचे भाऊ प्रदीप उके यांना ईडीने ताब्यात घेतलंय. यावरुन आता नाना पटोले यांनी आक्रमक भूमिका घेत भाजप आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधलाय.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांच्या घरावर गुरुवारी सकाळी अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने धाड टाकली. पाच तास चाललेल्या धाडीनंतर सतीश उके आणि त्यांचे भाऊ प्रदीप उके यांना ईडीने ताब्यात घेतलंय. यावरुन आता नाना पटोले यांनी आक्रमक भूमिका घेत भाजप आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधलाय. ‘सौ सोनार की एक लोहार की, आमच्याकडे मसाला तयार आहे, आम्ही दणका देणार’, असा शब्दात पटोले यांनी भाजपला थेट इशारा दिलाय. भाजप जे कटकारस्थान रचत आहे त्याविरोधात मोहीम आखणार असल्याचंही पटोले यांनी यावेळी सांगितलं.