VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 5 December 2021
काल रात्री राज्यमंत्री दत्तात्रय भरणे इंदापूरहून जात असताना त्यांच्या समोर इंदापूर बारामती रस्त्यावर एका दुचाकी स्वार आणि टेंपोचा अपघात झाला. अपघात झाल्याचं समजताच दत्तात्रय भरणे यांनी त्यांचा ताफा थांबवला. अपघातात जखमी झालेल्यांची चौकशी करून त्याला ताफ्यातील पोलिसांच्या गाडीत बसवून रुग्णालयात पाठवून दिलं.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांची संवेदनशीलता पुन्हा एकदा दिसून आली आहे. दत्तात्रय भरणे काल त्यांचा विधानसभा मतदारसंघ इंदापूरच्या (Indapur) दौऱ्यावर होते. काल रात्री राज्यमंत्री दत्तात्रय भरणे इंदापूरहून जात असताना त्यांच्या समोर इंदापूर बारामती (Indapur Barmati Road) रस्त्यावर एका दुचाकी स्वार आणि टेंपोचा अपघात झाला. अपघात झाल्याचं समजताच दत्तात्रय भरणे यांनी त्यांचा ताफा थांबवला. अपघातात जखमी झालेल्यांची चौकशी करून त्याला ताफ्यातील पोलिसांच्या गाडीत बसवून रुग्णालयात पाठवून दिलं.