VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 6 November 2021

| Updated on: Nov 06, 2021 | 3:23 PM

खंडणी वसुलीप्रकरणी अटकेत असलेला निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला 13 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वाझे सध्या मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात आहे. गोरेगावमधील एका वसुली प्रकरणात सचिन वाझेला मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले होते.

खंडणी वसुलीप्रकरणी अटकेत असलेला निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला 13 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वाझे सध्या मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात आहे. गोरेगावमधील एका वसुली प्रकरणात सचिन वाझेला मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले होते. वाझेचा ताबा मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केलं होतं. त्यावेळी त्याला 6 नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्याची कोठडी संपल्याने त्याला पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं असता त्याच्या कोठडीत 13 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

VIDEO : Nagar Hospital Fire | नगरच्या शासकीय रुग्णालयाच्या आगीत 10 जणांचा होरपळून मृत्यू
VIDEO : Nagar Fire | नगर रुग्णालय दुर्घटनेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून शोक व्यक्त