VIDEO : 50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 8 September 2021

| Updated on: Sep 08, 2021 | 2:52 PM

बेळगाव महापालिकेवर भगवाच फडकला असा दावा करताय तर मग बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव पालिकेच्या पहिल्याच सभेत पारित करा, असं आव्हानच संजय राऊत यांनी भाजपला दिलं आहे. संजय राऊत यांनी ट्विट करून हे आव्हान दिलं आहे.

बेळगाव महापालिकेवर भगवा झेंडाच फडकला आहे असा दावा भाजपने केला आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र केलं आहे. बेळगाव महापालिकेवर भगवाच फडकला असा दावा करताय तर मग बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव पालिकेच्या पहिल्याच सभेत पारित करा, असं आव्हानच संजय राऊत यांनी भाजपला दिलं आहे. संजय राऊत यांनी ट्विट करून हे आव्हान दिलं आहे. बेळगावात एकीकरण समितीचा पराभव घडवून आणला. भाजपाचे महाराष्ट्रातील पुढारी म्हणतात आमचा भगवा बेळगावर फडकला. मग एक करा. पालिकेच्या पहिल्या सभेत बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव मंजूर करा.

VIDEO : Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 8 September 2021
tv9 Podcast | Crime Kisse | बॅडमिंटनपटू Syed Modi 26 व्या वर्षी हत्या, पत्नी-प्रियकर संशयित