VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 9 December 2021

| Updated on: Dec 09, 2021 | 3:26 PM

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devedndras Fadnavis) यांनी शेलारांची पाठराखण केलीय. आशिष शेलार महिलांचा अवमान करूच शकत नाहीत. महापौरांविषयी तर अजिबातच नाही. त्यांच्या प्रेसनोटचा, वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला. महापौरांबद्दल आम्हाला अतिशय आदर आहे, असं ते म्हणालेत.

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devedndras Fadnavis) यांनी शेलारांची पाठराखण केलीय. आशिष शेलार महिलांचा अवमान करूच शकत नाहीत. महापौरांविषयी तर अजिबातच नाही. त्यांच्या प्रेसनोटचा, वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला. महापौरांबद्दल आम्हाला अतिशय आदर आहे, असं ते म्हणालेत. ते शिवसेनेच्या विरोधात सातत्यानं बोलतात, म्हणूनच त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौरांबाबत केलेलं वक्तव्य अवमानकारक असल्याची प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chankar) यांनी दिलीय. मुंबईच्या मरीन लाइन्स पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईच्या पोलीस आयुक्तांना या संदर्भातला सत्यस्थिती अहवाल मागितला आहे.

VIDEO : Ashish Shelar | मी कोणालाही उद्देशून बोललो नव्हतो, जबाब नोंदवल्यानंतर आशिष शेलारांची प्रतिक्रिया
VIDEO : शरद पवारांना खूर्ची देण्याच्या प्रसंगावरुन संजय राऊत भाजपला म्हणाले की, ही ### बंद करा