Video | 50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज |
लोकलच्या धर्तीवर आज मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्यांना मंदिरं आणि मॉल्समध्ये प्रवेश देण्याची शक्यता आहे.
50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज |
1) लोकलच्या धर्तीवर आज मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्यांना मंदिरं आणि मॉल्समध्ये प्रवेश देण्याची शक्यता आहे.
2) मराठी क्रांती मोर्चाच्या बैठकीमध्ये खासदार संभाजी राजे यांच्या समोर कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. बोलू दिलं जात नसल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी हा गोंधळ घातला.
3) महाराष्ट्र पेटवायला वेळ लागणारा नाही. मला दोन मिनिटं टालगतील, असं वक्तव्य खासदार संभाजी छत्रपती यांनी केलं.
4) मराठा आरक्षणासाठी मंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेडमध्ये आंदोलन करणार असे खासदार संभाजी छत्रपती यांनी म्हटलंय.
5) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नाशिकमधील महाराष्ट्र पोलीस अकादमीमधील विविध उपक्रमांचं उद्घाटन करण्यात आलं.