मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीत फडणवीसांना वाढता पाठिंबा, ‘या’ नवनिर्वाचित 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
आता राज्याच्या मुख्यमंत्रिपदाबाबत जोरदार चर्चा होतांना दिसत आहे. भाजपचे नेते- कार्यकर्ते यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पहिली पसंती मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्रिपदासाठी दोन फॉर्म्युला निश्चित करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जनतेनं महायुतीला कौल देत भरघोस यश त्यांच्या पदरी पाडलं. त्यानंतर आता राज्याच्या मुख्यमंत्रिपदाबाबत जोरदार चर्चा होतांना दिसत आहे. भाजपचे नेते- कार्यकर्ते यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पहिली पसंती मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्रिपदासाठी दोन फॉर्म्युला निश्चित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या २ फॉर्म्युल्यावर महायुतीच्या बैठकीत चर्चा झाली आहे. मुख्यमंत्रीपदाचा अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला असा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आग्रह असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर 2-2-1 म्हणजेच या फॉर्म्युलानुसार भाजपकडे दोन वर्षे, शिंदे गटाकडे दोन वर्षे आणि अजित पवारांकडे एक वर्ष मुख्यमंत्रिपद दिले जाईल. या फॉर्म्युलासाठी अजित पवार गट हा प्रचंड आग्रही आहे. दरम्यान, मुख्यमंत्रीपदासाठी महायुतीत देवेंद्र फडणवीसांना वाढता पाठिंबा मिळताना दिसत असून आता नवनिर्वाचित पाच अपक्ष आमदारांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली आहे. या पाच नवनिर्वाचित अपक्ष आमदारांमध्ये रत्नाकर गुट्टे, विनय कोरे, अशोकराव माने, रवी राणा आणि शिवाजी पाटील यांचा पाठिंबा आहे.