मराठा आरक्षणाचा एल्गार पुकारणाऱ्या जरांगे पाटील यांच्याविरोधात पोलीस तक्रार, कुणी केली कारवाईची मागणी?

| Updated on: Oct 06, 2023 | 11:37 AM

tv9 Special report | मराठा आरक्षण मिळावं म्हणून एल्गार पुकारणारा कार्यकर्ता मनोज जरांगे पाटील यांची राज्यभरात संवाद यात्रा सुरु आहे. मात्र या संवाद यात्रेदरम्यान, जरांगे पाटील यांच्या अडचणी वाढणार? कारण जरांगे यांच्या एका टीकेवरुन छगन भुजबळ यांचे समर्थक पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले

मुंबई, ६ ऑक्टोबर २०२३ | मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची संवाद यात्रा सुरु आहे. मात्र या संवाद यात्रेत जरांगे यांच्या एका टीकेवरुन छगन भुजबळ यांचे समर्थक पोलीस स्टेशनमध्ये गेले आहेत. मनोज जरांगे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करा, अशी तक्रार समता परिषदेनं छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांत केली आहे. मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यामध्ये शाब्दिक चकमक सुरु झाली आहे. आता हे प्रकरण थेट छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांत पोहोचलं आहे. छगन भुजबळ यांच्या समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जरांगे पाटील यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. भुजबळांबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करत, जरांगेंवर गुन्हा दाखल करुन, त्यांच्या सभेलाच बंदी घाला अशी मागणी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांची आहे. मनोज जरांगे यांची तक्रार ज्या टीकेवरुन करण्यात आली, ती टीका 6 दिवसांआधीची म्हणजे त्यांच्या संवाद यात्रेतील आहे. छगन भुजबळ यांना बळ देऊ नका म्हणत, जरांगेंनी टीका केली होती. त्यानंतर भुजबळ यांच्या समर्थकांची भूमिका काय आहे बघा स्पेशल रिपोर्ट

Published on: Oct 06, 2023 11:34 AM
अमोल मिटकरी यांचा पक्षालाच थेट इशारा, बघा नेमकं काय म्हणाले?
पुण्याचं पालकमंत्रिपद मिळालं आता मुख्यमंत्रिपदही? देवेंद्र फडणवीस यांना नेमकं सांगायचंय काय?