मनोज जरांगे-लक्ष्मण हाकेंचं उपोषणस्थळ… वादाचं मोहोळ अन् आरोप-प्रत्यारोप

| Updated on: Sep 23, 2024 | 10:21 AM

मराठा आणि ओबीसीच्या छेडलेल्या आंदोलनात मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके समर्थक हे आमने-सामने आलेत. यावेळी तणावपूर्ण शांतता असली तरी पाच किलोमीटरच्या पट्ट्यात सुरू असलेल्या तीन अंदोलनामुळे आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत.

जरांगेंच्या उपोषणानंतर वडीगोद्रीत सुरू झालेल्या उपोषणस्थळाच्या मार्गावर दोन्ही बाजूने घोषणाबाजीचे सत्र कायम आहे. घोषणाबाजीच्यावेळी शब्दाला शब्द वाढल्याने मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके समर्थक आमने-सामने आलेत. वास्तविक महाराष्ट्राचं भौगोलिक क्षेत्रफळ हे ३ लाख ७ हजार ७१३ चौरस मीटर एवढं परसलं आहे. मात्र उपोषण आणि समर्थकांचा वाद हा फक्त पाच किलोमीटरच्या पट्ट्यात घडतोय. मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी या गावात १७ सप्टेंबर पासून उपोषण सुरू केले. त्याच्या दुसऱ्यादिवशी पुण्याचे मंगेश ससाणे हे अंतरवाली सराटीत पोहोचले आणि १८ सप्टेंबर पासून त्यांनी ओबीसींसाठी आंदोलन सुरू केले. यानंतर सोलापूरच्या लक्ष्मण हाके यांनी वडीगोद्री गावात पोहोचून १९ सप्टेंबरपासून उपोषण सुरू केले. तर वडीगोद्री हे गाव अंतरवाली सराटीपासून ५ किमीवर आहे. वडीगोद्री गावासमोर धुळे सोलापूर महामार्ग आहे. त्याच्या प्रवेशावरच लक्ष्मण हाके उपोषणाला बसले तर अतंरवालीमध्ये जाण्यासाठी एकच प्रमुख रस्ता आहे. त्यामुळे मनोज जरांगेंच्या समर्थकांना अंतरवालीत जाण्यासाठी हाके बसलेल्या उपोषण स्थळाच्या रस्त्यावरून जावं लागत आहे. यावेळीच एकमेकांचे समर्थक आमने-सामने आलेत.

Published on: Sep 23, 2024 10:21 AM
‘शिवरायांच्या पुतळ्याचे पैसे राणेंच्या निवडणुकीसाठी…’, ठाकरे गटातील नेत्याचा गंभीर आरोप
एकनाथ खडसे नेमके कुणीकडे? ना भाजपात प्रवेश झाला, ना राष्ट्रवादीने राजीनामा स्वीकारला?