वेळ आली तर ठाकरेंसाठी तलवारीचे वार घेण्यास तयार… ‘त्या’ बॅनर्सची का होतेय चर्चा?

| Updated on: Jun 26, 2024 | 4:49 PM

विधान परिषदेवर शरद कोळींना आमदार म्हणून संधी देण्याची समर्थकांची या बॅनरच्या माध्यमातून मागणी करण्यात आली आहे. तर 40 गद्दारांविरुद्ध उभा ठाकलेला एक कडवट शिवसैनिकाला विधान परिषदेवर आमदार करावे अशी महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांची मागणी, असा आशय त्यावर लिहिला आहे.

सोलापुरात शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्या समर्थकांची बॅनरबाजी केल्याचे पाहायला मिळाली. होऊ घातलेल्या विधान परिषदेवर शरद कोळींना आमदार म्हणून संधी देण्याची समर्थकांची या बॅनरच्या माध्यमातून मागणी करण्यात आली आहे. तर 40 गद्दारांविरुद्ध उभा ठाकलेला एक कडवट शिवसैनिकाला विधान परिषदेवर आमदार करावे अशी महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांची मागणी, असा आशय त्यावर लिहिला आहे. या बॅनरवर शरद कोळी यांनीच प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी पदासाठी, खुर्चीसाठी, हार- तुऱ्यासाठी किंवा आमदारकीसाठी पक्षात प्रवेश केला नाही. ज्या शिवसैनिकांनी मला आमदारकी मिळावी अशी मागणी केली त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. मला आमदारकी मिळावी म्हणून काम करत नाही’, असे त्यांनी म्हटले. पुढे ते असेही म्हणाले, 40 गद्दारांचे शाब्दिक वारच नव्हे तर वेळप्रसंगी तलवारीचा वार देखील उद्धव ठाकरेंसाठी घेण्यास तयार आहे. ज्यावेळी 40 गद्दार पक्षातून गेले त्यावेळी अनेक लोक शांत बसली होती. मात्र मी, सुषमा अंधारे, संजय राऊत, भास्कर जाधव आम्ही विरोधकांना चारी मुंड्या चित केल्याचेही त्यांनी म्हटले.

Published on: Jun 26, 2024 04:49 PM
मी कोल्हापूरचा, मला बदामाची गरज नाही; रोहिणी खडसेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचं मिश्किल भाष्य
भेटता कसले, हिम्मत असेल तर राजीनामा द्या; नीट प्रकरणावरून जितेंद्र आव्हाडांचं अजितदादांना खुलं आव्हान