शिवसेना अन् राष्ट्रवादीवर ‘सुप्रीम’ फैसला, विधानसभा निवडणुकीच्या आधी नेमका काय येणार निर्णय?
आता १६ आमदारांची सुप्रीम कोर्टात अपात्रता आणि आयोगाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालावर सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टात येत्या १५ जुलै रोजी शिवसेना पक्ष आणि चिन्ह या प्रकरणावर तर १९ जुलै रोजी आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी होणार आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट?
शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरून सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणीला सुरूवात होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मूळ राजकीय पक्ष शिंदे आणि अजित पवार यांना दिल्यानंतर आता अंतिम फैसला सुप्रीम कोर्टात होणार आहे. यासोबतच आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावरही सुनावणी होणार आहे. राहुल नार्वेकर यांनी १० जानेवारी रोजी मूळ राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता दिली. मात्र त्यावेळी शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं तर कुणीही अपात्र नव्हतं. त्यानतंर आता १६ आमदारांची सुप्रीम कोर्टात अपात्रता आणि आयोगाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालावर सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टात येत्या १५ जुलै रोजी शिवसेना पक्ष आणि चिन्ह या प्रकरणावर तर १९ जुलै रोजी आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी होणार आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
Published on: Jul 07, 2024 10:29 AM