‘2 महिन्यात दुकानांवर मराठी नावांच्या पाट्या लावा’, सुप्रीम कोर्टाचे नेमके आदेश काय?
VIDEO | सुप्रीम कोर्टाचा मुंबईसह महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांना दिला सल्ला? दोन महिन्यात दुकानांवर मराठी नावांच्या पाट्या लावा, मुंबईसह महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांना आदेश दिले आहेत. या आदेशानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टाचे मानले आभार
मुंबई, २६ सप्टेंबर २०२३ | दोन महिन्यात दुकानांवर मराठी नावांच्या पाट्या लावा, सुप्रीम कोर्टाचे मुंबईसह महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांना आदेश दिले आहेत. या आदेशानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टाचे आभार मानले आहे. राज ठाकरे यांनी काय केलं ट्वीट बघा… ‘पुढील २ महिन्यांत महाराष्ट्रातील दुकानं, आस्थापन ह्यांच्यावर मराठी पाट्या लागल्याचं पाहिजेत असा स्पष्ट निकाल सुप्रीम कोर्टाने दिला, त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार. महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुकानावर आणि आस्थापनांवर ठळक मराठी भाषेतील पाटी हवी म्हणजे हवी, आणि हे पाहणं आता महापालिका प्रशासन आणि काही प्रमाणात पोलीस प्रशासनाचं काम आहे. दुकानदारांनी पण नसत्या भानगडीत पडू नये आणि न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा. आणि इथलं सरकार लक्ष ठेवेल, कारवाई करेल ती करेल, पण माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं पण लक्ष असेल हे विसरू नका’, असे ट्वीट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी करत सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालानंतर सुप्रीम कोर्टाचे आभार व्यक्त केल्याचे पाहायला मिळत आहे.