Shiv Sena : शिवसेनेची बहुमत चाचणी विरोधात सर्वोच्च न्यायालयाच याचिका, सायंकाळी 5 वाजता सुनावणी
सुप्रीम कोर्टात बहुमत चाचणीविरोधात पाच वाजता तातडीची सुनावणी होणार आहे. संध्याकाळी पाच वाजता सुनावणी होण्याआधी तीन वाजेपर्यंत याबाबतची कागदपत्र सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. केंद्रालाही याप्रकरणी बाजू मांडायची आहे. बहुमत चाचणी विरोधीत याचिका सुनावणीला सुप्रीम कोर्टानं हिरवा कंदील दाखवला आहे.
मुंबई : राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आलाय. महाविकास आघाडी सरकार शिवसेनेतील (Shivsena) बंडखोर एकनाथ शिंदे (Eknath Shinde News) गटामुळे अडचणीत आलंय. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी दिलेल्या आदेशाविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. उद्या कोणत्याही परिस्थितीत बहुमत चाचणी (Floor test in Maharashtra) करण्याच्या अनुशंगाने राज्यपालांनी दिलं आहे. पण, आता यावर सुप्रीम कोर्टात याला आव्हान देण्यात आलं असून याप्रकरणी संध्याकाळी पाच वाजता तातडीची सुनावणी होणार आहे. संध्याकाळी पाच वाजता सुनावणी होण्याआधी तीन वाजेपर्यंत याबाबतची कागदपत्र सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. केंद्रालाही याप्रकरणी बाजू मांडायची आहे. बहुमत चाचणी विरोधीत याचिका सुनावणीला सुप्रीम कोर्टानं हिरवा कंदील दाखवला आहे. याप्रकरणी आज संध्याकाळी पाच वाजता नेमका सुप्रीम कोर्ट काय निकाल देतं, हे पाहणं महत्त्वाचं आहे.