Special Report | धाकधूकही वाढली ! 16 आमदार अपात्र झाल्यास पुढं काय? सत्तासंघर्षावर याच आठवड्यात लागणार निकाल?
VIDEO | सत्तासंघर्षाचा निकाल याच आठवड्यात? निकाल नेमका काय लागणार? 16 आमदारांचं काय होणार? बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : सत्तासंघर्षाचा निकाल याच आठवड्यात लागण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे निकाल नेमका काय लागणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदारांचं काय होणार? यावरुन दावे-प्रतिदावेही सुरु झालेत आणि धाकधूकही वाढलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामधील सत्तासंघर्षाचा निकाल आता आठवडाभरावर आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनीही म्हटलंय की, सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच लागेल. आता लवकर म्हणजे किती? तेही जाणून घेणं महत्त्वाचं आहे. सध्या चर्चा सुरु असल्यानं कर्नाटकात 10 मे रोजी मतदान आहे आणि कर्नाटकच्या विधानसभेचा निकाल 13 मे ला आहे. त्यातच घटनापीठातील 5 न्यायमूर्तींपैकी एक न्यायमूर्ती निवृत्त होत आहेत. एम.आर.शाह 15 मे रोजी निवृत्त होत आहेत आणि 20 मे पासून सुप्रीम कोर्टाची उन्हाळी सुट्टी सुरु होतेय. न्यायमूर्ती एम.आर. शाहांच्या निवृत्तीआधीच निकाल लागू शकतो. आता त्यांची निवृत्तीची 15 तारीख जर लक्षात घेतली आणि इतर तारखा किंवा सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाचा विचार केला तर सुप्रीम कोर्टाचं कामकाज सोमवारी ते शुक्रवारपर्यंत चालतं. त्यामुळे आता या 5 तारखांपैकी 3 दिवस फार महत्वाचे आहे. 10, 11 आणि 12 तारीख. त्यामुळे या 3 दिवसांत निकाल लागण्याची शक्यता आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट