महाराष्ट्राच्या राजकारणात उद्या काय घडणार? सत्तासंघर्ष प्रकरणावर सकाळी १०.३० वाजता निर्णय
VIDEO | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जाणार की नाही? उद्या होणार फैसला
मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्ष प्रकरणात उद्या सकाळी साडेदहा वाजता सुप्रीम कोर्ट महत्त्वाचा निर्णय जाहीर करणार आहे. सत्तासंघर्षाचं प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार की नाही, याबाबत उद्या कोर्टात महत्त्वाचा निर्णय होणार आहे. या सुनावणीदरम्यान दोन्ही गटांच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. या सुनावणीदरम्यान दोन्ही गटाचा युक्तिवाद आज पूर्ण झाला. त्यानंतर कोर्ट आता हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग करु शकतं किंवा अंतिम निकाल जाहीर करु शकतं. त्यामुळे कोर्ट उद्या काय निकाल देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष या सुनावणीकडे राहणार आहे. 16 आमदारांवरील अपात्रतेची कारवाई, विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपाल यांचे अधिकार अधोरेखित करणारे दावे-प्रतिदावे पाच सदस्यीय घटनापीठासमोर करण्यात आले. या खटल्याची सुनावणी आता सात सदस्यीय घटनापीठासमोर व्हावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.