ओबीसी राजकीय आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा दिवस

| Updated on: Feb 08, 2022 | 9:24 AM

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे राज्य सरकारच्या वतीने हा अंतरिम अहवाल आज न्यायालयात सादर केला जाणार आहे.

ओबीसी आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकार कडून आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा करण्यात आलाय. दरम्यान आज ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे राज्य सरकारच्या वतीने हा अंतरिम अहवाल आज न्यायालयात सादर केला जाणार आहे. त्यामुळे आज न्यायालय नेमकं काय निर्णय देणार याकड राज्यातल्या ओबीसी समाजाच लक्ष असणार आहे. स्थानिक स्वराज्य निवडणूकीसह अनेक निवडणुकांमध्ये ओबीसींना आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होणार का हे आजच्या सुनावणीनंतर निश्चित होणार आहे.